स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या दुप्पट होणार

मुंबई – शासन मालकीच्या जागेतील १६ हजार ८८५ अंगणवाड्या गेल्या ३ वर्षात स्मार्ट करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली. स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या दुप्पट करण्यात येणार असून ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागांमध्ये आहेत त्यांचे भाडे दुप्पट करण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.त्या म्हणाल्या की, भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने […]

चांगली उंची नसेल तर विद्यापीठात प्रवेश नाही व्हिएतनाममध्ये नवीन नियम

हनोई : व्हियतनामची राजधानी हनोईच्या व्हियतनाम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेसने आपल्या प्रवेश नियमांत अजब बदल केला आहे. विद्यापीठाने या वर्षी व्यवस्थापन कोर्समध्ये प्रवेशासाठी उंचीच्या मानकाचा समावेश केला आहे. विद्यार्थिनींसाठी किमान ५ फूट २ इंच आणि विद्यार्थ्यांसाठी ५ फूट ४ इंच उंची निश्चित केली आहे. प्रथम विद्यापीठाने सर्व कोर्सेससाठी उंचीचे मानक निश्चित केले […]

सीमाशुल्क विभागाच्या वाहनांना ट्रकने उडवले! एकाचा मृत्यू

नाशिक नाशिकमध्ये सीमाशुल्क विभाग पथकाच्या वाहनांना अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवले. यामध्ये सीमाशुल्क विभागाच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू झाला, ३ कर्मचारी गंभीर जखमी झाले. काल मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस सीमाशुल्क विभागाची वाहने या ट्रकचा पाठलाग करत होते. यावेळी लासलगाव-चांदवड […]

विक्रमी गर्मीनेजपान होरपळला

टोकियो- जपानमध्ये सध्या गर्मीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.जपानच्या टोकाई आणि कांटो परिसरात काल पारा विक्रमी ४० अंश सेल्सीअसवर पोहोचला होता.जपानच्या हवामान विभागाने देशातील २६ प्रांतांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) अलर्ट जारी केला आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.यावर्षी पहिल्यांदाच जपानमध्ये दोनशे शहरे उष्णतेच्या लाटेचा सामना करीत आहेत. जनतेला आवश्यकता […]

पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड ठाण्यात ३ दिवस पाणी कपात

ठाणे – भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळे ठाण्यात पुढील तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या कालावधीत ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. भातसा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन […]

मायक्रो टनेलिंग, पंपिंग स्टेशनमुळे मुंबईत पाणी साचणार नाही मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई – मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचते .!मायक्रो टनेलिंग तसेच पम्पिंग स्टेशनची कामे पूर्ण झाल्यावर हे पाणी साचणार नाही. पावसाच्या साचणाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळेल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुंबईमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महापालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन […]

पुरीच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी दोघांचा मृत्यू ! १३० जखमी

पुरी – पुरी येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले . काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केली . आज रथयात्रेचा दुसरा दिवस होता. […]

केजरीवाल यांच्या याचिकेवर ईडीला उत्तर देण्याची नोटीस

नवी दिल्ली – आपल्यावर सध्या विविध न्यायालयात ३५ खटले सुरु असून त्यासाठी कारागृहात आठवड्यातून चार दिवस वकीलांची भेट देण्याची परवानगी द्यावी अशी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर तिहारचे तुरुंग अधिकारी व ईडीने आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस उच्च न्यायालयाने जारी केली आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या […]

उत्साही वारकरांच्या जनसागराततुकाबा-ज्ञानेबांचे पहिले रिंगण संपन्न

इंदापूर – इंदापुरातील बेलवाडी येथे टाळ-मृदुंगाचा गजरात आज सकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. बेलवाडीत सकाळी ७ वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांची गर्दी झाली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली, तर फलटणमधील चांदोबाचा लिंब येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पहिले रिंगण पार पडले. त्यात […]

पवई तलाव ओव्हरफ्लोऔद्योगिक क्षैत्राला दिलासा

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव आज पहाटे ४.४५ वाजता भरून वाहू लागला. या तलावांचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्घ वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. त्यामुळे या तलावावर अवलबूंन असलेल्या औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.१८९० साली १२.५९ लाख रुपये खर्चुन हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र […]

राहुल गांधींनी मणिपूरच्या विस्थापितांची भेट घेतली

गुवाहाटी – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आसामच्या कछार जिल्हयातील मणिपूर मधील हिंसाचारात होरपळलेल्या निर्वासितांच्या छावणीत राहात असलेल्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सुमारे १ हजार ७०० लोक आसाममध्ये आश्रयाला आले आहेत.त्यांची आस्थेने विचारपूस करून मणिपूरचा मुद्दा संसदे उपस्थित करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हिंसाचार […]

संदेशखाली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ममतांना झटका

नवी दिल्ली – संदेशखाली मधील महिलांचे लैगिंक शोषण, जमीन हडपणे व रेशन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले . उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ममता बॅनर्जी यांना हा एक मोठा झटका समजला जात आहे. परिणामी […]

रायगडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका

रायगड किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी आज सकाळी गडावर अडकलेल्या ३०० शिवभक्तांची सुटका करण्यात आली. या सर्वांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आले. शिवाय आज शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैपर्यंत रायगडावर जाणारा पायरी मार्ग आणि रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसरशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले.”रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळे भारताला या राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पोस्ट केले.मोदी हे सकाळी १०.५५ वाजता हवाई […]

कोस्टल रोडची सी-लिंक ते वरळी एक मार्गिका खुली होणार

मुंबई मुंबईतील कोस्टल रोडच्या वांद्रे ते वरळी सी- लिंक प्रवासाची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. वांद्रे सी- लिंक ते वरळी थडानी जंक्शनपर्यंत दोन अधिक दोनपैकी एक मार्गिका ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी माहिती दिली. “वांद्रे सी-लिंक ते वरळीपर्यंतची एक मार्गिका गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्याचे प्रयत्न […]

एसटी महामंडळामार्फत कामगार पालक दिन

मुंबई स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या लहान- मोठ्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा पालक दिन १५ जुलै पासून दुपारी ३ ते ५ या वेळेत विभागातील एका आगारात आयोजित करण्यात येणार आहे. विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ‘कामगार पालक दिन’ […]

बायजूजने कामगारांचे पगार थकवले ! दिवाळखोरीचा इशारा

बंगळुरु – स्टार्टअप कंपनी बायजूजने कर्मचाऱ्यांचे २.३ कोटी रुपयांचे वेतन थकविले असून कंपनीच्या ६२ कर्मचाऱ्यांनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला आहे.बायजूजने जानेवारी २०२४ पासून या कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे या ६२ कर्मचाऱ्यांनी कॅनव्हास लिगल या कायदेविषयक सल्लागार कंपनीमार्फत बायजूजला नोटीस पाठविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बायजूज अनेक कारणांमुळे अडचणीत आली आहे. बायजूजच्या बाजार […]

पनवेल, शहापुरात पावसाचा कहर रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई – नवी मुंबईसह ठाणे, पनवेल, कळंबोली, शहापूर परिसरात आज पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच साठले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने नाशिक, कोकण तसेच कल्याण कसारा दरम्यानच्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.रात्रीपासून शहापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहापूरमधील भारंगी नदीला […]

राजकीय नेत्याच्या मुलाचे हिट अ‍ॅण्ड रन महिलेला निर्दयीपणे फरफटत नेले

मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरला अल्पवयीन मुलाने केलेला अपघात आणि त्याला वाचवण्यासाठी कुटुंब व यंत्रणांची धडपड हे प्रकरण ताजे असतानाच आज मुंबईतही हिट अँड रनचा प्रकार घडला. राजकीय संबंध असलेल्या धनाढ्य व्यक्तीच्या मुलाने शनिवारी रात्री 18 हजारांचे मद्यपानाचे बिल देऊन बीएमडब्ल्यू ही महागडी गाडी चालवित एका कोळी दाम्पत्याला धडक दिली. त्यानंतर निर्दयीपणे त्या महिलेला काही अंतर […]