मी भारतात येणार! बैजू रविंद्रनचा दावा

दुबई- मी पळून गेलेलो नसून माझ्या वडिलांच्या उपचारासाठी दुबईत आहे. मी लवकरच भारतात परतणार असल्याचा दावा बैजू रविंद्रन याने केला आहे. परत येण्याची निश्चित वेळ ठरली नसली तरी मी लवकरच तिथे येऊन लोकांना काय ते सांगेन, असेही तो म्हणाला आहे.बैजू रविंद्रन याच्यावर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, […]

दिवाळीला बोनस मिळणार! लाडकी बहीण अफवांच्या घेऱ्यात

मुंबई – महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून निवडक लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्यामुळे महिला गोंधळात पडल्या आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या […]

रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र वैधच! सुप्रीम कोर्टाचा शासनाला दणका

नागपूर- काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र वैधच असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करण्यात यावा, अशी विनंती राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी जातवैधता समितीने बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यामुळे रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक […]

याह्या सिनवारच्या हत्येनंतर गाझामध्ये युद्धविरामाची शक्यता

तेल अवीव – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात काल हमासचा दहशतवादी नेता याह्या सिनवार ठार झाला. त्याच्या मृत्यूमुळे हमासला मोठा धक्का बसला आहे. आपला नेता मारला गेल्याने हमास आता इस्रायलशी युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवण्याची चर्चा आहे.गेल्या महिन्यात इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनियेचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेची सुत्रे याह्या सिनवारकडे आली होती. त्याआधी याह्या हमासच्या लष्करी आघाडीचा […]

मुदा घोटाळा प्रकरणी ईडीचे कार्यालयावर छापे

बंगळुरू- जमीन वाटप घोटळ्याप्रकरणी कर्नाटकातील म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (मुदा)च्या कार्यालयावर आज ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यात ईडीच्या पथकाने याप्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेतली.या छापेमारीदरम्यान कार्यालयाबाहेर सीआरपीएफ जवानांसह स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले होते. ईडीच्या या पथकात १२ अधिकाऱ्यांना समावेश होता. या प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबियांचेही नाव आहे.जुलैमध्ये लोकायुक्त आणि पोलिसांकडे दाखल केलेल्या […]

विशाळगड घाटात बिबट्या! पर्यटकांत भीतीचे वातावरण

कोल्हापूर-जिल्ह्यातील विशाळगड-आंबा दरम्यानच्या विशाळगड घाटात प्रवास करणार्‍या प्रवाशांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले. मात्र या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.हा घाट परिसर असल्याने इथे जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. कोसळणारा पाऊस आणि हिरव्यागार डोंगर दऱ्यातून फेसाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकही इथे येतात. पर्यटनाला आलेल्या काही पर्यटकांना मानोली हद्दीत रस्त्यांवर एका वळणावर बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याचा […]

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार दिवाळी बोनस

मुंबई- राज्यातील महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड होणार आहे.राज्याच्या ऊर्जा विभागाने ही घोषणा केली. वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांना १९ हजार रुपये तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. वीज कर्मचारी संघटनेने ९ ऑक्टोबर रोजी या बोनसची मागणी केली होती. मात्र, […]

सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्या पाठोपाठ आता भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. रात्री एक वाजता […]

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? सभेसाठी प्रमुख पक्षांमध्ये चुरस

मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचारसभा घेण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस लागली आहे.१७ नोव्हेंबर रोजी म्हणजे प्रचार थांबण्याच्या आदल्या दिवशी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गट , शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि मनसे या चार पक्षांनी अर्ज केले आहेत.सर्वात आधी मनसेने अर्ज केल्याने त्यांनाच प्राधान्य दिले जाईल,अशी शक्यता आहे.निवडणुका तोंडावर […]

नाशकात व्यापाऱ्याच्या खळ्यातून कांदा चोरी

नाशिक- पिंपळगाव बसवंत तालुक्यातील कांदा खळ्यावर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करून १४ ते १५ गोणी कांदे चोरून नेल्याची घटना उंबरखेड रोड येथे घडली आहे.पिंपळगाव येथील कांदा व्यापारी हर्षल खाबिया यांचे उबंरखेड रोडवर कांद्याचे खळे आहे.या ठिकाणावरून मध्यरात्री चोरट्यांनी गाडीमध्ये येऊन कांद्यांची चोरी केली.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडण्याचा प्रयत्न करून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग होणारा डीव्हीआरही चोरून नेला. उंबरखेड […]

आरोपीचा पक्ष न पाहता मुसक्या आवळा! राज ठाकरे

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात विनयभंग झालेल्या एका पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपीचा पक्ष न पाहता त्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे.ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी सत्ताधारी […]

गौतम नगर, दादर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

मुंबई- बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक ११४, ११५, ४२१ तसेच, तक्षशिला महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ आणि संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम रविंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या निमित्ताने “अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र व बजेटचा हिस्सा” या विषयाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुद्धोदन आहेर यांनी […]

सीएए कायदा योग्यच सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली- केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे 6-अ कलम घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जज्जांच्या घटनापीठाने दिला. चार विरूध्द एक असा बहुमताच्या आधारे हा निकाल देण्यात आला.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. सूर्यकांत, न्या. एम. एम. सुंद्रेश, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने […]

काँग्रेसची यादी 20 ऑक्टोबरला! महायुतीचेही ठरले! भाजपा मुंबईतील अनेक आमदारांचा पत्ता कापणार

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, दोन्हींमधील पक्ष आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने 20 ऑक्टोबरला यादी जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे, तर महायुतीची यादीही 48 तासांत जाहीर होणार आहे. भाजपाची पहिली यादी उद्याच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.महायुतीकडून जवळपास 240 जागांचे उमेदवार […]