मध्यप्रदेश-राजस्थानसह ४ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा

जयपूर – राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील ४ राज्यांत दाट धुक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके असते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळांना २३ नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ-इंदूरसह २८ शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी झाले आहे. तर दिल्ली, पंजाब आणि चंदिगड या उत्तर भारतातील राज्यांमध्ये […]
यंदा धारगळमध्ये ‘सनबर्न ‘ नकोच !उच्च न्यायालयात याचिका दाखल

पणजी – यंदाचा सनबर्न महोत्सव डिसेंबरच्या अखेरीस पेडण्यातील धारगळ येथे आयोजित केला जाणार आहे.मात्र त्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.इतकेच नाही तर या ‘सनबर्न’ विरोधात गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्थानिक नागरिक भारत नारायण बागकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली.हा महोत्सव धारगळमध्ये नकोच, असे त्यांनी याचिकेत म्हटले […]
सीबीएसईची १० वी आणि १२ वीची परिक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि पहिला पेपर शारीरिक शिक्षणाचा असणार आहे. तर १० वी बोर्डाच्या परीक्षाही १५ फेब्रुवारीला सुरू होणार असून पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.यावेळी सीबीएसईने गेल्या […]
शेअर बाजारात मोठी घसरण साडेपाच महिन्यांच्या निचांकी पातळी

मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली . या घसरणीत बाजार साडेपाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४२२ अंकांनी घसरून ७७,१५५ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराजा निफ्टी १६८ अंकांनी घसरून २३,३४९ अंकांवर बंद झाला. […]
ज्ञानेबांचा संजीवन समाधी सोहळा उद्यापासून सुरू

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबरला सकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतबाबा वंशज यांच्या हस्ते हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर […]
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे थंडीत खंड पडण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात थंडीने गारठला […]
दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आपची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना पक्षात प्रवेश देत पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आपने ११ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट दिले आहे. तर उर्वरित आपचेच […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च पुरस्कार

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला लस आणि औषधे दिल्याबद्दल डॉमिनिकाच्या राष्ट्राध्यक्ष सिल्व्हानी बर्टन यांनी मोदी यांना हा पुरस्कार दिला.या सोहळ्यात नरेंद्र मोदी म्हणाले की, “हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही तर हा १४० कोटी भारतीय […]
तारापूर एमआयडीसीत प्लास्टिक उत्पादक कारखान्याला आग

पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळ एका कारखान्यात सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात बेटेगाव येथील प्लास्टिक उत्पादनांसह दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला आग लागली होती. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. सुमारे ३ तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.आग लागल्यानंतर कारखान्यातून […]
१२ वी आणि १०वीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ […]
राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद पुण्यात

पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा १२ ते १८ अंशांच्या दरम्यान दिसून आला. हवामान खात्याच्या मते, पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीची तीव्रता वाढत आहे.आज […]
हिंदू एकात्मतेसाठी छतर पूरातून धीरेंद्र शास्त्रींची हिंदू यात्रा सुरू

छतरपूर – हिंदूंमधील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा भेद दूर करण्यासाठी आजपासून छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या १० दिवसीय हिंदू जोडो यात्रेला सुरू झाली. या यात्रेसाठी लोकांचा मोठा जनसागर लोटला. या लोकांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांनी मशिदींत आणि मंदिरांत आरतीनंतर वंदे मातरम म्हटले जावे,अशी मागणी केली.ही यात्रा सुरू […]
आता रशिया- युक्रेन युद्धाततीन ‘नाटो’ देशही उतरणार ?

स्टॉकहोम- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची परवानगी दिल्यानंतर तणाव आणखी वाढला.या तणावाची झळ रशियाच्या सीमेजवळ असलेल्या तीन नाटो देशांमध्येही पोहोचली आहे. रशियाने केलेल्या पलटवाराने नॉर्वे,स्वीडन आणि फिनलंड या तीन नाटो देशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे आता या तिन्ही देशांनी आपल्या नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा साठा ठेवण्याची आणि आपल्या सैनिकांना […]
निवडणूक प्रक्रिया आटोपून परतताना बीएलओचा मृत्यू

जळगाव – विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर दुचाकी अपघातात ठार झाले. ही घटना चोपडा येथे काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४८) असे या ठार झालेल्या बीएलओचे नाव आहे.ते चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. काल रात्री ते चोपडा येथून शिरपूर […]
जगातील सर्वांत मोठा सागरी पूल चीनमध्ये

बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते आहेत . या पुलाचे खांब बांधण्यासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या पुलाला भूकंपाचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली आहे. ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही […]
मतदानानंतर नागपुरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला

नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली. मतदानपूर्वी व मतदानानंतर हल्ले, दगडफेकीच्या घटनांचे चक्र सुरु होते. काल साडेसात वाजताच्या सुमारास मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक २६८ येथून तवेरा एसयुव्ही गाडीतून निवडणूक कर्मचारी ईव्हीएम घेऊन […]
उत्तर प्रदेशात अलीगढमध्ये भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या कृष्णा ट्रॅव्हल्सची डबल डेकर बस दिल्लीहून आझमगड आणि मऊकडे जात होती. यावेळी, यमुना एक्सप्रेस वेवर ५६ क्रमांकाच्या पॉईंटवर येताच बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच […]
‘फुकट’ची खैरात की, किळसवाणे राजकारण! जनतेने मतदान वाढवत कोणता निर्णय घेतला?

मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेने उत्साहाने मतदान करून गेल्या वेळचा 61.44 टक्के मतदानाचा टप्पा पार केला. यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे अधिकचे मतदान कुणाच्या पारड्यात पडेल, महाराष्ट्रातून सौदेबाजीचे राजकारण तडीपार करण्याचा […]
