Home / News / Cockroach janata party : कॉकरोच जनता पार्टी’च्या वेबसाईटवरून वाद; अभिजीत दिपके यांनीच अकाऊंट बंद केल्याचा आरोप

Cockroach janata party : कॉकरोच जनता पार्टी’च्या वेबसाईटवरून वाद; अभिजीत दिपके यांनीच अकाऊंट बंद केल्याचा आरोप

Cockroach janata party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (cockroach janata party)संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी सरकारने आपली वेबसाईट आणि सोशल...

By: Team Navakal
Cockroach janata party
Social + WhatsApp CTA

Cockroach janata party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (cockroach janata party)संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी सरकारने आपली वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाऊंट्स ब्लॉक केल्याचा दावा केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः एक्स (X) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सनी त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वेबसाईट आणि अकाऊंट त्यांनी स्वतःच बंद केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर तांत्रिक चर्चा (Technical Discussion) रंगली असून, अनेकांनी विविध स्क्रीनशॉट्स आणि डोमेन संबंधित माहिती शेअर करत दिपके यांच्या दाव्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही युजर्सनी दावा केला की संबंधित वेबसाईट सध्या ‘क्लायंटहोल्ड’ (ClientHold) स्थितीत आहे. याचा अर्थ वेबसाईट केवळ भारतातच नव्हे तर जगभरातूनच अ‍ॅक्सेस होत नसल्याचे दिसत आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या वेबसाईटवर सरकारकडून बंदी (Ban) घातली गेली असती, तर सामान्यतः अधिकृत आदेश, नोटीस किंवा इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून (ISP) ब्लॉकिंग दिसून आले असते. मात्र या प्रकरणात वेबसाईटचे डीएनएस (DNS) रेकॉर्डच उपलब्ध नसल्याचे काही तांत्रिक जाणकारांनी निदर्शनास आणले आहे.

डीएनएस रेकॉर्ड हटवले का?

सोशल मीडियावर मोहित मिश्रा नावाच्या युजरने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “जर डीएनएस रेकॉर्डच उपलब्ध नाहीत, तर वेबसाईट स्वतःच डिलीट केली असण्याची शक्यता आहे का? किंवा हॅकिंगमुळे (Hacking) डीएनएस रेकॉर्ड हटवले गेले असतील का?”

या प्रश्नानंतर सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. काही युजर्सनी आरोप केला की, “आधी स्वतःच डीएनएस रेकॉर्ड हटवून वेबसाईट बंद करण्यात आली आणि नंतर सरकार घाबरले आहे, असा दावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

तर काहींनी ही कारवाई डोमेन रजिस्ट्रारकडून (Domain Registrar) झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. डोमेनचे नूतनीकरण (Renewal), नियमभंग किंवा तांत्रिक कारणांमुळे ‘क्लायंटहोल्ड’ स्थिती लागू होऊ शकते, असेही काही तज्ज्ञांनी नमूद केले.

“आम्ही परत आलो आहोत”

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी दावा केला आहे की त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत “आम्ही परत आलो आहोत” असा संदेश दिला. या व्हिडिओनंतर त्यांच्या समर्थकांकडून सरकारविरोधात टीका करण्यात येत आहे, तर विरोधकांकडून त्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अण्णा हजारे यांचा पाठिंबा चर्चेत

Anna Hazare
Anna Hazare

‘कॉकरोच जनता पार्टी’ला ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्ष, सरकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Expression) यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नियंत्रण, वेबसाईट सुरक्षा, डोमेन व्यवस्थापन आणि सोशल मीडिया राजकारण या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.


हे देखील वाचा –

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा

देवस्थान इनाम कायदा मंदिरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे ! मंदिर महासंघाच्या सुनील घनवटांचा आरोप

मध्यप्रदेशात नूरजहा आंब्याला व्हीव्हीआयपी सुरक्षा! ५ किलो वजनाच्या एका आंब्याची किंमत आहे तरी किती ?

अंधेरी ते वर्सोवा; पश्चिम मुंबईत राज ठाकरे यांचा दौरा

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या