अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी जामनगर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा

गांधीनगर :

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा असल्याने २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत जामनगर विमानतळाला आंतरष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत हे आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले विमानतळ असणार आहे, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. त्याअनुषंगाने या विमानतळावर कस्टम, इमिग्रेशन आणि क्वारंटाईन सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

जामनगर हा संरक्षण दलासाठीचे विमानतळ आहे. मात्र या ठिकाणी व्यावसायिक उड्डाणांना संमती देण्यात आलेली आहे. आता या विमानतळाला दहा दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाही देण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगही उभारली आहे. या विमानतळामध्ये फाल्कन २०० सारखी सहा लहान विमाने किंवा एअरबस ए ३२० सारखी तीन मोठी विमाने मावतात. शुक्रवारी अरायव्हल आणि डिपार्चर मिळून १४० उड्डाणे झाली. विमानतळ प्रशासनाने प्रवासी इमारतीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठराविक जागेपेक्षा अधिक जागा वाढवून दिली आहे. यासोबतच शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top