इन्फोसिसला मोठा झटका! १२५०० कोटींचा करार रद्द

बंगळुरु- देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने सप्टेंबरमध्ये एका जागतिक स्तरावरील कंपनीसोबत केलेला मोठा करार आता रद्द झाला आहे. हा करार १.५ अब्ज डॉलर म्हणजेच १२५०० कोटी रुपयांचा होता. याबद्दल इन्फोसिसने माहिती दिली आहे. २३ डिसेंबरला जागतिक कंपनीसोबतचा करार मोडल्याची माहिती आहे.
जागतिक कंपनीसोबतचा करार कृत्रिमबुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित होता. त्यामुळे हा करार मोडल्याचा फटका इन्फोसिसला बसू शकतो. हा करार १५ वर्षांसाठी करण्यात आला होता. पण केवळ ३ महिन्यांच्या कालावधीतच तो रद्द झाला. इन्फोसिस आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जागतिक कंपनीला डिजिटल एक्सपीरियन्स आणि एआय सोल्युशन्स पुरवणार होती. या करारामुळे इन्फोसिससाठी गेला सप्टेंबर महिना कॉन्ट्रक्ट व्हॅल्यूच्या दृष्टीने उत्तम गेला.
दरम्यान, गेल्या ३ महिन्यांत हा कंपनीसाठीचा दुसरा झटका आहे. कंपनीचे माजी सीएफओ नीलांजन रॉय यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. आता १२५०० कोटींचा करार रद्द झाला आहे. नारायण मूर्ती सहसंस्थापक असलेल्या इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ६,२१२ कोटींची कमाई केली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीची तुलना करता नफ्यात ३ टक्क्यांची वाढ झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top