गोव्यातील म्हापसा शहरात वाहन पार्किंगसाठी शुल्क

म्हापसा – म्हापसा शहरातील पालिका हद्दीत चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी आता शुल्क आकारले जाणार आहे. उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या पालिका क्षेत्रात अशा वाहनांसाठी ‘पे पार्किंग ” अधिसूचना काढली आहे.बवाहन पार्किंगला शिस्त लागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुचाकी वाहनांना २ तासांसाठी १० रुपये तर पुढील प्रत्येक तासाला ५ रुपये आकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांना पहिल्या २ तासांसाठी २० रुपये, तर पुढील प्रत्येक तासाला १० रुपये पार्किंग शुल्क आकारला जाणार आहे. शहरातील युनियन फार्मसी ते लोजा चिमुलकर,कॅनरा बँक,चणा शॉप बिल्डिंगच्या आतील बाजूस फक्त दुचाकींचे पार्किंग असेल. तर आराम सोडा बिल्डिंगच्या समोरील रस्ता आणि चणा शॉप बिल्डिंगच्या बाहेरील भागात चारचाकी वाहने पार्क करता येतील. विभागीय कार्यालय इमारतीजवळ रस्त्याच्या दुतर्फा आणि केणीवाडी येथील म्हापसा क्लिनिक ते प्रभावती निवास रस्त्यावर फक्त दुचाकी वाहनांसाठी पार्किंग शुल्क असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top