मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकाचे सामूहिक राजीनामे

बीड – बीड जिल्ह्यात पतसंस्था मल्टीस्टेट घोटाळ्याचे जणू काही लोणच पसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.पुन्हा एकदा बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून माजलगाव येथील मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या ८ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत.या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत. यात मागील महिन्यातच जिल्ह्यातील २० शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने खळबळ उडाली होती.यानंतर आता माजलगावच्या मराठवाडा अर्बन पतसंस्थेच्या संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top