समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंडमध्ये मंजूर

डेहराडून- उत्तराखंड विधानसभेत आज दिवसभराच्या चर्चेनंतर बहुचर्चित समान नागरी कायदा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. हे विधेयक कोणाच्याही विरोधात आणलेले
नसल्याने देशातील इतर राज्यांनीही या कायद्याबाबत विचार करावा असे आवाहन यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केले.
समान नागरी कायद्याला देशातील अल्पसंख्याक समाजाचा विरोध होता. तरीही उत्तराखंड मधील भाजपा सरकारने काल हे विधेयक विधानसभेत मांडले. त्यावर आज दिवसभर चर्चा होऊन विरोधकांनी काही दुरुस्त्या सुचवल्या पण त्या फेटाळून आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top