गौतम नगर, दादर येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

मुंबई- बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक ११४, ११५, ४२१ तसेच, तक्षशिला महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ आणि संबोधी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम रविंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या निमित्ताने “अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र व बजेटचा हिस्सा” या विषयाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गदर्शक म्हणून शुद्धोदन आहेर यांनी […]

सीएए कायदा योग्यच सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली- केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे 6-अ कलम घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जज्जांच्या घटनापीठाने दिला. चार विरूध्द एक असा बहुमताच्या आधारे हा निकाल देण्यात आला.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. सूर्यकांत, न्या. एम. एम. सुंद्रेश, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने […]

काँग्रेसची यादी 20 ऑक्टोबरला! महायुतीचेही ठरले! भाजपा मुंबईतील अनेक आमदारांचा पत्ता कापणार

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, दोन्हींमधील पक्ष आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसने 20 ऑक्टोबरला यादी जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे, तर महायुतीची यादीही 48 तासांत जाहीर होणार आहे. भाजपाची पहिली यादी उद्याच जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.महायुतीकडून जवळपास 240 जागांचे उमेदवार […]

रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी पुन्हा काम करु शकणार

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे. कर्मचारी कमीत कमी २ वर्षी किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत काम करु शकतील. रेल्वेच्या १ ते ७ या श्रेणीमध्ये काम करणारे कर्मचारी यासाठी पात्र असतील. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने होणार […]

पोलीस, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण रखडले

नागपूर : राज्यात बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांच्या यूपीएससी, एमपीएससीसह ‘आयबीपीएस’च्या व पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आता प्रशिक्षण संस्थांची निवडही करण्यात आली. मात्र, अद्यापही या संस्थांकडून कार्यादेश मिळाला नसल्याच्या संस्थांच्या तक्रारी आहेत. बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’च्या विविध प्रशिक्षणासाठी पूर्व प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ‘टीआरटीआय’च्या नेतृत्वात […]

बिहार विषारी दारू सेवनमृतांचा आकडा २६ वर

पाटणा – बिहारमधील सारण, सिवन व छप्रा जिल्ह्यात विषारी दारुचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. काल विषारी दारुमुळे १५ जणांचा मृत्यू झाला होता. काही जण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने काही वर्षांपासून दारुबंदी केली आहे. तरीही राज्यात अवैध दारुचा सुळसुळाट आहे. काल सकाळी मगहर व औरिया या गावात तिघांचा […]

‘लाडकी बहीण’ जाहिरातींवर 200 कोटींचा प्रचंड खर्च

मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात सर्वत्र झळकत आहे. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीवरच्या जाहिराती सर्वत्र ही जाहिरात प्रत्येक दहा मिनिटांनी कुठे ना कुठे दिसतेच. तर या योजनेच्या जाहिरातीवर राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून उघड झाले आहे. विशेष म्हणजे या खर्चामध्ये चालू आठवड्याचा […]

‘लाडकी बहीण’ योजनेला टच केला तर कार्यक्रम करणार महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा मविआला इशारा

मुंबई – राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आज महायुतीने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गेल्या दोन-अडीच वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढा मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी वाचला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, लाडकी बहीण योजनेला टच कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी महाविकास […]

मेट्रो-३ वरून विमानतळावर जाण्या-येण्यासाठी मोफत बससेवा

मुंबई- मुंबई मेट्रो-३ सेवेच्या टी-२ स्थानकापासून आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने मुंबई मेट्रो प्राधिकरणाने विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत बससेवा सुरू केली आहे.मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.या बसमध्ये प्रवाशांना त्यांच्या सामानासाठी लोडर सुविधाही उपलब्ध असेल. विमानतळाहून आरे ते बीकेसीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी एमएमआरसीने मोफत बस सेवेची […]

नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना ?

नवी दिल्ली – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर रोजी संपत असून आपला उत्तराधिकारी म्हणून सरन्यायाधीशपदी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची त्यांनी शिफारस केली आहे. चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहून खन्ना यांचे नाव सूचविले आहे.न्या. संजीव खन्ना हे चंद्रचूड यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांची शिफारस केंद्र सरकारने मान्य केल्यास न्या. संजीव खन्ना […]

By E-Paper Navakal / October 17, 2024 / 1 minute of reading

परभणी- राज्यात २४ ऑक्टोबर पासून मान्सून निघून जाणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. पण १८ ऑक्टोबरला नांदेड, लातूर, परळी, धाराशिव, बीड, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण पट्टी, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये भाग बदलत तुरळीक ठिकाणी पावसाचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. परतीचा पाऊस […]

निकिता पोरवाल २०२४ ची फेमिना मिस इंडिया

मुंबई – ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२४ चा किताब उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. काल रात्री मुंबईत या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मध्यप्रदेशच्या उज्जैनची निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर आता निकिता पोरवाल ‘मिस वर्ल्ड’ साठी तयारी करणार आहे. मिस इंडिया स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर आनंद व्यक्त […]

जळगाव-पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून दररोज

जळगाव – एप्रिल महिन्यात गोवा- जळगाव आणि हैदराबाद-जळगाव पुणे या विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या विमान सेवांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता २७ ऑक्टोबरपासून या सेवा दररोज सुरू होणार आहेत,अशी घोषणा विमान कंपन्यांकडून करण्यात आली आहे.दरम्यान,जळगाव मुंबई ही तीन दिवस सुरू असलेली विमानसेवासुद्धा दररोज सुरू करावी, बंद पडलेली जळगाव अहमदाबाद सेवा देखील […]

माथेरानची मिनी ट्रेन१ नोव्हेंबर पासून सेवेत

नेरळ – मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून ते माथेरान या पर्यटनस्थळी जाणारी मिनी ट्रेन सेवा येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. पावसाळ्यात १ जूनपासून ही ट्रेनसेवा बंद केली जाते ती १५ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु केली जाते. यंदा मात्र ती सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले असून दिवाळी सुटीच्या आधी ती सुरू झाली […]

शेअर बाजारात सलगतिसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९४ अंकांनी घसरून ८१,००६ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२१ अंकांच्या घसरणीसह २४,७४९ अंकांवर बंद झाला.देशांतर्गत शेअर बाजारासाठी घसरणीचा हा सलग तिसरा आठवडा ठरला. आज निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचे दोन प्रमुख निर्देशांक जवळपास दोन […]

रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस

नवी दिल्ली – रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याआधी भारतीय रेल्वेची तिकीटे १२० दिवस आधी आरक्षित करता येत होती. येत्या १ नोव्हेंबर पासून ही कालमर्यादा केवळ ६० दिवस करण्यात आलेली आहे. प्रवासाचा दिवस वगळता हे आरक्षण करता येणार आहे. रेल्वे बोर्डाने या संदर्भातील पत्र सर्व विभागीय […]

‘आप’चा महाराष्ट्रात विधानसभा लढणार नाही

मुंबई- दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आपने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपाचा मोठा फायदा झाला होता. याचे इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने […]

समृद्धी महामार्गावर ट्रकलाकारची धडक! एकाचा मृत्यू

वाशीम – समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली. त्यात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पहाटे घडली. बळीराम ग्यानबा पिसे (२४) असे मृताचे नाव आहे.समृद्धी महामार्गावर नागपूरवरून लोणारकडे कारने बळीराम पिसे जात होते. वालई येथे ही कार ट्रकला मागून धडकली. या धडकेचा प्रचंड मोठा आवाज होताच […]

५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अंमलबजावणी अखेर सुरू

कोल्हापूर – ‘लाडकी बहीण’ सारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्यानंतर आता १००, २०० रूपयांचे स्टॅम्प पेपर म्हणजेच मुद्रांक बंद होणार आहेत.आता सर्व व्यवहार ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागणार आहेत. महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी कालपासून राज्यभरात सुरू झाली.दरम्यान,महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला आहे. आतापर्यंत प्रतिज्ञापत्र,भाडे करार, […]

नंदुरबारमध्ये बिबट्या अखेर जेरबंद

नंदुरबार- नंदुरबार नगरपालिका हद्दीतील मधुबन कॉलनीत गेल्या महिनाभरापासून दोन बिबटे फिरत होते. दोन दिवसांपूर्वीही रहिवाशांना बिबट्याचा टेकड्यांवर मुक्त संचार पाहावयास मिळाला होता. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नंदुरबार वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. अखेर आज पहाटे नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र, दुसरा बिबट्या अजूनही […]

गायक लिअम पेन याचे अर्जेटिनात अपघाती निधन

ब्युनॉस – आयर्सआपल्या वन डिरेक्शन या गीतामुळे जगभरात पोहोचलेला गायक व कलाकार लिअम पेन याचे अर्जेटिनामधील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. तो ड्रग व दारुच्या अंमलाखाली असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता अर्जेंटिनाच्या पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.३१ वर्षांचा लिअम पेन हा जागतिक दर्जाचा ब्रिटिश गायक […]

हरियाणात नायब सिंह सैनींनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली

चंडीगढ- हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी यांनी आज शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंचकुला येथील सेक्टर ५ मधील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. यावेळी कृष्णन लाल पनवार, राव नरबीर सिंह, महिपाल ढांडा आणि विपूल गोयल, अरविंद […]

वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे धारावीतून निवडणूक लढविणार?

मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर वानखेडे सध्या चेन्नई येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये कार्यरत आहेत. त्यांना निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटले की, “पक्ष […]

नाशिकातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबरला बंद पुकारणार

नाशिकधोकादायकपणे चाललेल्या डिझेल विक्रीच्या बेकायदेशीर व्यवसायावर पंधरवड्यात कारवाई न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप चालक ३१ ऑक्टोबर रोजी बंद पुकारणार आहेत. नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.संघटनेच्या सभासदांनी विविध भागात बेकायदेशीरपणे चाललेल्या एलडीओ विक्री केंद्रांना भेटी देऊन अवलोकन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. याची माहिती निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात […]